पुणे - बालेवाडीतील नामांकित नेमबाजी अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या अवघ्या १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी खेळाडू व्यवस्थापकाला तीन वर्षांची सक्तमजुरी आणि सात हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा विशेष न्यायालयाने सुनावली. .रुद्र गौडा चनवीर गौडा पाटील (वय २८, रा. साई चौक, पाषाण; मूळ रा. बेळगाव, कर्नाटक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. हिवसे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. न्यायालयाने आरोपीला सात हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून, दंड न भरल्यास त्याला दोन महिने अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागणार आहे..मे २०१९ मधील घटनापीडित मुलगी ही जन्माने अमेरिकन असून, तिचे वडील भारतीय आहेत. उन्हाळी सुट्यांमध्ये पिस्तूल नेमबाजी शिकण्याच्या हेतूने तिच्या आईने तिला बालेवाडी येथील नेमबाजी अकादमीत दाखल केले होते. याच काळात आरोपी व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. चहा, नाश्ता किंवा शीतपेय देण्याच्या बहाण्याने तो मुलीच्या जवळ येत होता..तिच्या शरीराला वेळोवेळी हेतुपुरस्सर स्पर्श करत तिच्यावर अत्याचार केला. मुलीने या प्रकाराला विरोध करत तो प्रकार तत्काळ कुटुंबीयांना सांगितला. २० मे २०१९ रोजी मुलीच्या आईने अकादमीच्या वरिष्ठांना याबाबत माहिती दिली.मात्र, त्यांनी आश्वासन देऊनही कोणतीही कारवाई केली नाही. अखेर मुलीच्या आजीने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले..न्यायालयीन लढ्याला यशसरकार पक्षातर्फे सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी काम पाहिले. फिर्यादीकडून अॅड. पुष्कर पाटील आणि अॅड. मयुर धाटावकर यांनी युक्तिवाद केला. एकूण सहा साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. पीडित मुलीची साक्ष, अकादमीतील अधिकाऱ्यांचे जबाब आणि सीसीटीव्ही फुटेज न्यायालयासाठी महत्त्वाचे ठरले..खोटे आरोप असल्याचा बचाव फेटाळलाआरोपीने आपली बाजू मांडताना मुलीला बंदूक नीट हाताळता येत नसल्यामुळे आपण ओरडलो, म्हणून तिने खोटी तक्रार केली असा दावा केला. मात्र, पीडीतेकडे आरोपीविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यास कोणतेही कारण नव्हते, असे अॅड. अगरवाल यांनी न्यायालयासमोर सप्रमाण सिद्ध केले..समाजात ठोस संदेशाची गरजया प्रकरणातील निर्णय समाजात अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांबाबत 'शून्य सहिष्णुता”चा संदेश देणारा ठरतो. अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना कोणतीही गय दिली जाणार नाही, असेही या निकालातून अधोरेखित होते. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशी मागणी फिर्यादी पक्षाने केली होती. न्यायालयाने साक्षी, पुरावे आणि कायद्याच्या आधारे आरोपीला दोषी धरत शिक्षा सुनावली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.