esakal | एेकलंत का! सॅनिटायझरची बचत करायचीय? मग ही बातमी वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

manas garge.jpg


पुण्यातील मानस गर्गेने तयार केले स्मार्ट हॅंड सॅनिटायझर डिस्पेंसर 

एेकलंत का! सॅनिटायझरची बचत करायचीय? मग ही बातमी वाचाच

sakal_logo
By
जितेंद्र मैड

कोथरूड (पुणे) : लॉकडाऊनमध्ये स्वतःला बंद करून घेण्यापेक्षा मनाची कवाडे उघडत बुद्धिमत्तेच्या बळावर नावीन्यपूर्ण संशोधन करण्याचे काम करणारा किशोरवयीन मानस गर्गे सर्वांच्या कौतुकाचा विषय बनला आहे. नुकतेच दहावी पास झालेल्या मानसने स्मार्ट हॅंड सॅनिटायझर डिस्पेंसर तयार केले आहे. त्यासाठी आपल्याला बटन दाबायची गरज नाही. सेन्सरने नियंत्रित केलेल्या बाटलीसमोर हात नेताच त्यावर सॅनिटायझर पडते. हात दूर करताच सॅनिटायझर पडणे बंद होते. या यंत्रामुळे 90 टक्के सॅनिटायझरची बचत होते. आवश्‍यक तेवढे सॅनिटायझर घेतले जात असल्यामुळे सॅनिटायझर वाया जात नाही. 

पुण्यात फिल्मीस्टाईल थरार; खूनाचा प्रयत्न करणाऱ्याचा पोलिसांनी केला पाठलाग आणि...

कर्वेनगरमधील शाहू कॉलनीत राहणारा मानस डीईएस सेकंडरी स्कूलमध्ये दहावी पास झाला. त्याने बनवलेले मशिन बाजारातील याच प्रकारच्या यंत्राच्या किमतीच्या केवळ 25 टक्के रकमेत तयार करण्यात आले आहे. यामध्ये हात कितीही वेळ यंत्रासमोर ठेवला तरी 7 एमएल एवढेच सॅनिटायझर बाहेर येते. त्यामुळे त्याला स्मार्ट हे नाव दिले आहे. मानसने स्वतःचे एक युट्यूब चॅनेल तयार करून या यंत्राची माहिती प्रसिद्ध केली. ते पाहून एका कंपनीने संपर्क साधून सदर उपकरणाचे उत्पादन करण्याची तयारी दाखवली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सातवीला असताना मानसने जलाभिसरण व जलपातळीदर्शक उपकरण बनवले. टाकीतून वाया जाणारे पाणी, झाडांना आवश्‍यकतेपेक्षा जास्त दिले जाणारे पाणी ही एक प्रकारची पाण्याची नासडीच आहे. ती या उपकरणाद्वारे रोखता येते. स्मार्ट सॅनिटायझर, शेत फवारणी, घरातील स्वच्छता याविषयी संशोधन करून नवे प्रयोग जनतेसाठी खुले करणा-या मानस सारख्या विद्यार्थ्यांमुळे भारताचे भविष्य उज्ज्वल आहे यात शंका नाही. 
 

loading image
go to top