

Dilip Walse Patil Urges Villagers to Maintain Unity
Sakal
मंचर : “आदर्शगाव गावडेवाडी (ता.आंबेगाव) गावाला आत्तापर्यंत वेळोवेळी विविध विकासकामांसाठी भरभरून निधी दिला आहे. गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. गावातील विकासकामांना चालना मिळावी यासाठी ग्रामस्थांनी आपापसातील मतभेद विसरून एकजुटीने पुढे चालावे. मदतीचा हात देणाऱ्यांना साथ द्या, गावाने एकनिष्ठ राहावे. गावाला कधीच निधीची कमतरता भासू देणार नाही.” असा विश्वास माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.