

A stunning celestial pairing of the crescent Moon and bright Venus lit up the evening sky over Manchar on September 14, offering skywatchers a beautiful astronomical spectacle.
Sakal
मंचर : संध्याकाळच्या निरभ्र आकाशात सोमवारी (ता. १४) चंद्राची सुंदर कोर आणि तिच्या शेजारी तेजस्वी शुक्र ग्रह असा मनोहारी खगोलीय नजारा पाहायला मिळाला. चंद्रकोरीच्या अगदी जवळ लुकलुकणारा तेजस्वी शुक्र पाहण्यासाठी नागरिकांनी आकाशाकडे नजर वळविली. या नयनरम्य दृश्याचे छायाचित्र अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपले.