

Police have booked four accused for attempted murder after the entire incident was captured on CCTV following a dispute related to a love marriage.
Sakal
मंचर : बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून मेव्हण्याचा जीव घेण्याच्या उद्देशाने भररस्त्यात कारने मोटारसायकलला धडक देऊन त्यानंतर हॉकी स्टिक, लोखंडी पाइप व दांडक्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. १८) दुपारी सुमारे तीन वाजता मंचर शहरात घडली. या घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, मंचर पोलिसांनी चार जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा (कलम ३०७) गुन्हा दाखल केला आहे.