Pune: मंचरमध्ये जुने जन्म-मृत्यू दाखले रखडले; विद्यार्थ्यांचे प्रवेश,नोकरीसाठी अर्ज या कामावर मोठा परिणाम ,नागरिकांमध्ये नाराजी

Over 400 Birth and Death Certificates Pending in Manchar: मंचर नगरपंचायतीतील जुने जन्म-मृत्यू दाखले CRS पोर्टलवर अपलोड न झाल्याने ४०० हून अधिक अर्ज प्रलंबित आहेत.
Pune

Pune

esakal

Updated on

डी.के.वळसे पाटील

मंचर, ता. २७ : मंचर (ता.आंबेगाव) नगरपंचायतीकडील जुन्या जन्म आणि मृत्यू नोंदी अद्याप केंद्र शासनाच्या सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम (CRS) पोर्टलवर पूर्णपणे अपलोड न झाल्याने नागरिकांना दाखले मिळण्यात मोठा विलंब होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय प्रवेश,नोकरीसाठी अर्ज करणारे युवक तसेच विविध शासकीय कामांसाठी दाखल्यांची गरज असलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सद्यस्थितीत गेल्या तीन महिन्यापासून ४०० हून अधिक दाखले प्रलंबित आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com