
मंचर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईतील राज्यात मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेले सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आले. राज्य शासनाने प्रलंबित मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावल्याची घोषणा होताच, मंगळवारी (ता.२) मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवून व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.