मदत असावी अशी...मजुरांचे रात्री चालणे झाले सुरक्षित... 

manchar
manchar
Updated on

मंचर (पुणे) : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून रात्री परप्रांतीय, मजूर व कामगार हे पायी, सायकल व मोटरसायकलवरून आपापल्या गावी जात आहेत. सामाजिक बांधिलकी जपत मंचर शहरामध्ये अशा लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची, नाश्‍ता व चहाची; तर सुविधा केलीच, पण विशेषतः रात्री प्रवास करताना भरधाव वाहनांपासून त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी त्यांना रिफ्लेक्‍टीव जॅकेट व टॉर्च देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंचर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी पुढाकार घेतला आहे. 

असा हटके प्रयोग राबविले जात असल्याने पुन्हा एकदा "मंचर पॅटर्न' चर्चेत आला आहे. सरपंच गांजाळे यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतः, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांसमवेत मंचर शहरात तीन वेळा प्रतिबंधक औषधांची फवारणी केली आहे. गेल्या दीड महिन्यापासून ते घरी गेले नाहीत. त्यांचा मुक्काम मंचर ग्रामपंचायतीत आहे. लॉकडाउनची काटेकोर अंमलबजावणी करून किराणा माल घरपोच देण्याचा सर्वप्रथम उपक्रम त्यांनी राबविला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही त्यांना फोन आला होता. अनेक हटके प्रयोगामुळे गांजाळे हे चर्चेत आले आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

याबाबत दत्ता गांजाळे म्हणाले, ""रस्त्याने प्रवास करत असताना झालेल्या अपघातामुळे काही मजुरांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सूचनेवरून रिफ्लेक्‍टीव जॅकेट व टॉर्च मजुरांना मंचरकारांनी मंगळवारी (ता. 13) रात्री स्वखर्चातून दिले आहेत. हा उपक्रम या पुढेदेखील सुरू ठेवला जाईल. या वस्तूंची किंमत 70 रुपये आहे. महामार्गावरील सर्व ग्रामपंचायती व दानशुरांनी पुढाकार घेऊन प्रवास करणाऱ्यांना या वस्तू भेट द्याव्यात. त्यामुळे त्यांचा प्रवास सुरक्षित होईल. तसेच, काही मजुरांना मंचर येथून त्यांच्या गावी जाण्यासाठी विविध वाहनात बसून देण्यात आले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com