Fake Milk Racket Busted in Mancher
sakal
मंचर : पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरात बनावट दूधनिर्मिती करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा अन्न सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला असून या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान सुमारे २ लाख४ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल आणि १ हजार ३८५ किलो भेसळयुक्त साहित्य जप्त करण्यात आले आहे.