शेतकरी सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी 4 हजार विस्तारक नेमणार - संजय थोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Thorat

केंद्र व राज्य सरकारच्या अनेक नाविन्यपूर्ण व लोककल्याणकारी योजना आहेत.

Manchar News : शेतकरी सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी 4 हजार विस्तारक नेमणार - संजय थोरात

मंचर - केंद्र व राज्य सरकारच्या अनेक नाविन्यपूर्ण व लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांचा फायदा सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुचनेनुसार प्रदेश भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात चार हजार किसान मोर्चा विस्तारक नेमले जाणार आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील १०० विस्तारकांचा समावेश असणार आहे. विस्तारक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संपर्क साधणार आहेत.' अशी माहिती पुणे जिल्हा भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी दिली.

मंचर (ता. आंबेगाव) येथे भाजप पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत संजय थोरात बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे संघटक सरचिटणीस माऊली शेळके,जेष्ठ नेते रविंद्र त्रिवेदी, जिल्हा सरचिटणीस नवनाथ थोरात, अंकुश गवळी, संतोष शेलार उपस्थित होते. शरद चौधरी, नानासो गवळी, दत्तात्रय मळेकर, प्रकाश देसाई, रामदास रोडे, विठ्ठल कोह्राळे, योगेश गवळी, संदिप जाधव यांनी चर्चेत भाग घेतला.

'आंबेगाव तालुक्यात भाजप किसान मोर्चातर्फे पंतप्रधान पिक विमा योजना राबविणार आहे. याबाबत काही शंका व अडचण असल्यास शेतकर्यांनी मंचर येथील भाजप किसान मोर्चा जनसंपर्क कार्यालय येथे संपर्क करावा. असे नवनाथ थोरात यांनी सांगितले.

माऊली शेळके म्हणाले, 'विस्तारक नेमण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. त्यामुळे शेतकर्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल.'

'विस्तारकांमार्फत नमो महा सन्मान किसान निधी योजना, एक रूपयामध्ये पंतप्रधान पिक विमा योजना, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान, आरोग्यासाठी आयुष्यामान भारत,पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल अनुदान, महा डिबीटी द्वारे माघेल त्याला शेततळे, अस्तरिकरण, शेडनेट, हरिततग्रह, शेतीसाठी यांत्रिक औजारे अनुदान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान प्रतिव्यक्ती प्रतिवर्षी एक हजार ८०० रुपये रूपये अनुदान आदी लोककल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत.'

- संजय थोरात, जिल्हाध्यक्ष भाजप किसान मोर्चा पुणे.