Manchar Hospital: मंचरच्या सरकारी रुग्णालयाची भन्नाट कामगिरी! ३.५ स्टार रेटिंगसह पुणे जिल्ह्यात ठरले अव्वल

Manchar Government Hospital Tops Pune District With 35 Star Rating: दर्जेदार रुग्णसेवा, आधुनिक सुविधा व काटेकोर व्यवस्थापनाच्या जोरावर मंचर उपजिल्हा रुग्णालयाला ३.५ स्टार रेटिंग; पुणे जिल्ह्यात पहिला, तर पुणे आरोग्य मंडळात दुसरा क्रमांक
Pune District Manchar Government Hospital Gets 35 Star Rating For Excellent Patient Care Facilities And Hospital Management

Pune District Manchar Government Hospital Gets 35 Star Rating For Excellent Patient Care Facilities And Hospital Management

sakal

Updated on

-डी. के. वळसे पाटील

मंचर : सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘स्टार रेटिंग’ मूल्यमापनात मंचर (ता. आंबेगाव) येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दर्जेदार रुग्णसेवा, उपलब्ध सुविधा आणि उत्तम व्यवस्थापनाच्या जोरावर रुग्णालयाने ३.५ स्टार रेटिंग मिळविले असून, पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक, तर पुणे आरोग्य मंडळातील पुणे, सोलापूर व सातारा या तीन जिल्ह्यांत दुसरा क्रमांक पटकावला आहे. या तीन जिल्ह्यात एकूण ५० उपजिल्हा रुग्णालये आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com