arjun dhamdhere
sakal
मंचर - चांडोली खुर्द उपबाजार येथे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गुरुवारी (ता.४) नाफेड हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. ५३ रुपये ५८ पैसे प्रति किलो या शासकीय हमी बाजारभावाने सोयाबीन खरेदी करण्यात आली. सोयाबीनला वाढीव व स्थिर दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.