

Maharashtra Milk Adulteration Case Police Arrest Ten More In Manchar Taking Total Accused Arrested To 24
esakal
-डी. के. वळसे पाटील
मंचर : दूध भेसळप्रकरणी मंचर (ता. आंबेगाव)पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासाला वेग आला असून, पोलिसांनी आणखी दहा आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना घोडेगाव न्यायालयात हजर केले असता, त्यांना मंगळवार (ता११) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी या प्रकरणात १४ आरोपींना अटक करण्यात आली असून, ते न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात आहेत.