

Prachi Thorat Receives Enthusiastic Public Response in Manchar
Sakal
मंचर : “मंचर नगरपंचायत कार्यक्षेत्रात मी गेली आठ वर्ष समाज हितासाठी सतत काम करत आहे. त्यासाठी माझे जनसंपर्क कार्यालय आहे. माझी सून प्राची आकाश थोरात नगराध्यक्षपदासाठी अपक्ष निवडणुक लढवत आहेत. त्यांचे चिन्ह ‘ऑटो रिक्षा’ आहे. गृहनिर्माण संस्था, व्यापारी, लहान मोठे उद्योजक, युवक-युवती, फेरीवाले यांच्यासह जेष्ठ नागरिकांचा प्राची यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नगराध्यक्षपदावर प्राची विराजमान होतील.” असा विश्वास जनसेवक संजय थोरात यांनी व्यक्त केला.