
-डी. के. वळसे पाटील
मंचर: मंचर शहरात शनिवारी (ता.२) रात्री दहाच्या सुमारास भरचौकात घडलेल्या एका खळबळजनक घटनेत प्रशांत रवींद्र गांजाळे (वय ४५, रा. एस कॉर्नर, मंचर) या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. घटनेनंतर अवघ्या एक तासात पोलिसांनी खुनातील तिघा आरोपींना अटक करून मोठी कामगिरी केली आहे.