NCP Vandana Bankhele Elected Unopposed in Manchar Ward No. 1
Sakal
मंचर : मंचर नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार व नगरसेवकांच्या १६ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक आठ मध्ये सर्वाधिक सात उमेदवार उभे आहेत. प्रभाग क्रमांक एक मधून माजी खासदार (स्व) किसनराव बाणखेले यांच्या सून वंदना कैलास बाणखेले (राष्ट्रवादी कॉंग्रेस) या बिनविरोध निवडणून आल्या आहेत. त्यांच्यासाठी शिल्पा अमोल काजळे (शिवसेना) यांनी माघार घेतली आहे. महायुती व महाविकास आघाडीतही फुट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात युती, ठाकरे शिवसेना व पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात युती व कॉंग्रेस व आम आदमी पार्टी यांच्यात युती झाली आहे.