'आम्ही मंचरचे भाई आहोत, धंदा कसा काय करतोस तेच बघतो'

डी. के. वळसे पाटील
Tuesday, 19 January 2021

दगडाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंचर पोलिसांनी भाईगिरी करणारे राण्या बाणखेले (वय २७) व तुषार मोरडे (वय २३)  (दोघे रा. मंचर)  यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, दोघानाही मंगळवारी (ता. १९) अटक झाली आहे. 

मंचर : चित्रपटातील भाईगिरी करणाऱ्यांप्रमाणेच डायलॉगबाजीची घटना मंचर येथे घडली. ''आम्ही मंचरचे भाई आहोत, तू येथे धंदा कसा काय करतोस तेच बघतो.' अशी धमकी देऊन व्यावसायिक गिरीश जगन्नाथ थोरात (चांडोली बुद्रुक ता. आंबेगाव) व रमेश शेंगाळे (रा. मंचर) यांना शिवीगाळ, दगडाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मंचर पोलिसांनी भाईगिरी करणारे राण्या बाणखेले (वय २७) व तुषार मोरडे (वय २३)  (दोघे रा. मंचर)  यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, दोघानाही मंगळवारी (ता. १९) अटक झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंचर शहराच्या उत्तरेला असलेल्या गोसावीबाबा मंदिरात ही घटना घडली आहे. थोरात हे दर्शन घेत होते. त्यावेळी मंदिरात आलेला बाणखेले व मोरडे या दोघांनी  'तू मंचरचा भाई झाला आहेस का? असे म्हणत थोरातला दगडाने पाठीत व पायावर मारहाण करून जखमी केले. स्वतःची सुटका करून घेण्यासाठी थोरात यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी तेथे जवळ असलेले रमेश शेंगाळे मदतीसाठी धावून आले.

बाणखेले व मोरडे यांनी मारहाण केली. 'तू मंचरचा भाई झाला आहेस का?” असे आरोपी म्हणत होते. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र हिले तपास करत आहे. 

PSI महिला अधिकाऱ्याशी लव्ह मॅटर; पोलिस शिपायाने ठाण्याच्या टेरेसवरुनच मारली उडी​

मंचर शहरात भाईगिरी करणाऱ्यांची नावे संकलित करण्याचे काम मंचर पोलिसांनी सुरु केले आहे. व्यापारी व व्यावसायिकांना कोणी धमकावत असेल तर मंचर पोलिसांकडे त्वरित संपर्क साधावा. गुंडगिरी करणाऱ्यांना धडा शिकविला जाईल. गुंडगिरीचा बिमोड करण्याचे व शांतता व सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचे काम पोलिस करत आहेत. मंचर पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक : (02133)  पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे व्हाट्सअप मोबाईल  क्रमांक: 8108112260 येथे संपर्क करावा. -सुधाकर कोरे, पोलीस निरीक्षक मंचर 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manchar police did two criminals arrested