मंचर येथील शिल्पकार सुप्रिया शिंदे यांची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा 
 व सुप्रिया शिंदे.

मंचर येथील शिल्पकार सुप्रिया शिंदे यांची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद

मंचर - येथील शिल्पकार सुप्रिया शेखर शिंदे यांनी अत्यंत कमी कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बनवला आहे. त्याबद्दल त्यांची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद झाली आहे. त्या जगातल्या पहिल्या मेटलमध्ये काम करणाऱ्या महिला शिल्पकार ठरल्या आहेत. रोज चौदा तास सलग ७५ दिवस लॉस्ट व्याक्स कास्टिंगमध्ये काम करून १० फूट उंच,९ फूट लांब व चार फूट रुंद त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बनवला आहे. या कामाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये झाली आहे.

सुप्रिया शिंदे यांचा सन्मान शुक्रवार (ता. २४) रोजी सकाळी ११ वाजता पुणे-आंबेगाव खुर्द तुकाराम नगर येथील शिल्पसिद्धी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष पवन सोलंकी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार नितेश राणे, आमदार सर्वस्वी महेश लांडगे, भीमराव तापकीर, संजय जगताप, सरहद्द स्कूलचे संस्थापक संजय नहार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यापूर्वी त्यांना दोन राज्यस्तरीय व दोन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत. तसेच “सकाळ” ने “आयडॉल वुमन” पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.

“वडील बंडेश गांजाळे हे गणपती कारखानदार आहेत. लहानपणापासूनच वडिलांबरोबर गणेश मूर्ती बनविण्याचे काम केले. त्यानंतर विवाहबद्ध झाल्यानंतर पाच वर्ष शिल्पकलेचे शिक्षण पूर्ण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा,हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा सुखदेव, जेष्ठ नेते शरद पवार, माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्यासह आत्तापर्यंत ४० पुतळे तयार केले. मी तयार केलेल्या शिल्पाची नोंद “वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया”मध्ये झाली आहे. हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे.”

- सुप्रिया शेखर शिंदे, शिल्पकार मंचर, (ता. आंबेगाव).

Web Title: Manchar Sculptor Supriya Shekhars Entry In World Record Of India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top