Manchar Sends Aid Two Trucks of Groceries Dispatched for Paranda Flood Victims
sakal
मंचर - मराठवाडा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आंबेगाव तालुक्यात विविध संस्था व नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. एक कोटी पाच लाख रुपये जमा झालेल्या रक्कमेतून १५ हजार किराणा साहित्याचे कीट तयार करण्यात आले. सोमवारी (ता.६) मंचर येथून माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर किराणा साहित्याचे दोन ट्रक परांडा तालुक्यासाठी रवाना झाले.