

Intense Storm Hits Manchar: 36mm Rainfall in Just One Hour
Sakal
मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर शहर व परिसरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. अवघ्या एका तासात ३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून रस्त्यांवरून पुरासारखे पाणी वाहू लागले. अनेक ठिकाणी फलक कोसळले, तर पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.