
मंचर : विज्ञानयुगातही अंधश्रद्धेचे काळे सावट समाजातून जाता जात नाही, याचे ज्वलंत उदाहरण पुन्हा एकदा मंचर शहरात पाहायला मिळाले.तपनेश्वर स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी सांगाड्यावर पुष्पहार, लिंबू, लाल कापड, टाचण्या आणि बाहुलीसारखा बनावट प्रकार ठेवलेला आढळल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.