

Vehicles Stuck for Hours as Mandhardevi Yatra Peaks in Satara
Sakal
भोर : रविवारी (ता ११) साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे मांढर (ता वाई, जि.सातारा) येथील श्री काळुबाई मांढरदेवीच्या दर्शनाला भाविकांची तुफान गर्दी झाली. भाविकांच्या शेकडो गाड्या एकाच वेळी रस्त्यावर आल्यामुळे भोर शहरासह, भोर- कापूरहोळ,भोर- शिरवळ, भोर मांढरदेवी मार्गावर ट्रॅफिक जाम झाले. कापूरहोळ भोर आणि शिरवळ भोर मार्गाच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे काही ठिकाणी एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. त्यातच भोरमध्ये बैलगाड्यांच्या शर्यती असल्यामुळे त्या वाहनांची अधिकच भर पडली.