महेश टिळेकर यांनी दिली मंगल ताईंच्या गाण्याला दाद

चित्रपट निर्माता- दिग्दर्शक महेश टिळेकर यांच्या पाहण्यात एका अज्ञात गायिकेचा मराठी गीत गातानाचा व्हिडिओ आला होता.
Mangal javale - mahesh Tilekar
Mangal javale - mahesh TilekarSakal

पुणे : चित्रपट निर्माता- दिग्दर्शक महेश टिळेकर (Producer-Director Mahesh Tilekar) यांच्या पाहण्यात एका अज्ञात गायिकेचा (Singer) मराठी गीत गातानाचा व्हिडिओ आला. त्यानंतर टिळेकर यांनी त्यांचा शोध घेतला तर त्या कुडाळ येथील निघाल्या. त्यामुळे टिळेकर त्या गायिकेला भेटायला थेट तिच्या घरीच पोचले अन त्यांचा सन्मान करत पैठणी साडी भेट दिली.

मंगल जावळे
मंगल जावळेSakal

मंगल जावळे या एसटी स्थानकावर गाणी गाऊन मिळणाऱ्या शंभर-दोनशे रुपयात घर चालवतात. गाण्याचे कसलेही शिक्षण न घेतलेल्या मंगलताईंना सुंदर आवाजाची देणगी लाभली आहे. अशिक्षित असलेल्या मंगल ताई हिंदी व मराठी गाणी रेडीओवर ऐकून आपल्या आवाजात सादर करतात. त्यांच्या आवाजाने भारावून गेलेल्या महेश टिळेकर यांनी मंगलताईंना पैठणी साडी भेट देवून आर्थिक मदतसुध्दा केली आहे. इतरांनीही मंगल ताईंसारख्या कलाकारांना मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन टिळेकर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com