अजित पवार यांच्या मागे किती आमदार हे कळेल: बांदल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या बाजूने अधिकृतरित्या राष्ट्रवादीतील नेते बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे बांदल हेच पहिले नेते ठरले.

मुंबई : पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या बाजूने अधिकृतरित्या राष्ट्रवादीतील नेते बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे बांदल हेच पहिले नेते ठरले.

बांदल यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, 'अजितदादांचा राष्ट्रवादीतील गट त्यांच्यासाठी सक्रिय झाला आहे. अजितदादांच्या मागे किती आमदार आहेत हे विधानसभेत स्पष्ट होईल.'

दरम्यान, बांदल यांनी अजित पवार यांची भेट घेऊन पुन्हा राजकीय धांदल उडवून दिली आहे. अजित पवार यांच्या बाजूने अधिकृतरित्या राष्ट्रवादीतील नेते बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे बांदल हेच पहिले नेते ठरले. शरद पवार हे हिमालय आहे आणि त्यांच्यासाठी सह्याद्री कधीही धाऊन जाईल, असेही सांगण्यास ते विसरले नाहीत.

अजितदादा पवार हे पत्रकार परिषद घेणार असल्याचेही बांदल यांनी सांगितले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही शक्यता मावळल्याचे दिसत आहे. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पुण्यातील काही नगरसेवक, सोमेश्वर कारखान्याचे संचालक यांनी अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. पण अधिकृतरित्या त्यांना पाठिंबा कोणी दिला नव्हता. बांदल यांनी तो देऊन आपली निष्ठा त्यांच्यावरच असल्याचे दाखवून दिले. त्यांचा त्यांना फटका बसणार की फायदा होणार हे आगामी काळात दिसेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mangaldas bandal meets ajit pawar in mumbai