मंगलदास बांदल यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

बॅंकेत गहाण ठेवलेल्या जमिनीची परस्पर विक्री केल्याचे प्रकरण
The court
The court sakal

पुणे : गहाण ठेवलेल्या जमिनीची परस्पर विक्री केल्याप्रकरणात पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला.

बांदल यांनी त्यांच्या दोन साथीदारांच्या मदतीने बँकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून कर्ज मजूर करून घेतले. त्यांनतर हे पैसे स्वत:चे फायद्याकरीता वापरले. हप्ते न भरता त्या जमिनीची विक्री केली आहे. त्यामुळे त्यांचा जामीन फेटाळण्याचा युक्तीवाद सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी केला.

जमीन विकत घेण्यासाठी बांदल यांनी शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या वडगावशेरी शाखेतून दोन कोटी 10 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या प्रकरणात बांदलसह रुपेंदरकौर हरचरणपाल नंदा, हरचरणपाल मोहनसिंग नंदा (दोघेही, रा. कोंढवा), विजय दिनकर धुमाळ (पिंपळे धुमाळ, ता. शिरूर) आणि गोरख महादेव दोरगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 19 जनेवारी 2015 मध्ये घडलेल्या घटनेबाबत बॅंकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. रुपेंदरकौर आणि हरचरणपाल या दोघांच्या नावावर हे कर्ज काढण्यात आले होते. ही जमीन विजय धुमाळ याला विक्री करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी मंगलदास बांदल यांना अटक केली आहे. त्यावेळी दोन्ही नंदा यांनी हा व्यवहार बांदल यांनी केला असल्याचे सांगितले आहे.

The court
जनतेकडून पैसा काढून खास लोकांना दिला जातोय - राहुल गांधी

ही जमीन बांदल याने धमकावून मालक सुरेश शिंदे यांना विकण्यास लावली. व्यवहार एक कोटी 40 लाख रुपयांचा ठरला असताना, त्यांना केवळ 70 लाख रुपये देण्यात आले आहेत. खुनशी प्रवृत्तीचा आहे. त्यांच्यावर शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चार गुन्ह्याचा तपास सुरू आहेत. तर पूर्वी सात गुन्हे दाखल होते. त्याची शिक्रापूर परिसरात दहशत आहे. जामीन दिल्यास तपासावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जामीन फेटाळण्याची मागणी ऍड. राजेश कावेडीया यांनी दिली. शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ए. ए. खटावकर या गुन्ह्याचा तपास करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com