

पुणे येथे सात महिन्यांची गर्भवती महिला तनिषा भिसेंचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीमपणामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने त्यांना दाखल करण्यास नकार दिला होता. रुग्णालयाने उपचारासाठी १० लाख रुपये आकारले. महिलेचे कुटुंबीय अडीच लाख रुपये देण्यास तयार होते. तरीही, रुग्णालयाने उपचार सुरू करण्यास नकार दिला. यामुळे उपचारांना उशीर झाला आणि तनिषाची प्रकृती आणखी बिकट झाली. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे.