

आंबा, काजू उत्पादकांकडे
दुर्लक्ष केल्यास फळशेती धोक्यात
-----
ज्येष्ठ नेते शरद पवार ः मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा
-----
मुंबई ः राज्यातील आंबा, काजू बागायतदार शेतकरी संकटात असताना राज्य सरकारने दुर्लक्ष करणे म्हणजे भविष्यात कोकणातील फळबाग शेती धोक्यात येण्याची सुरुवात आहे, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.
दरम्यान १५ मे रोजी मुंबई येथे होणाऱ्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) पाठिंबा देऊन आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.
आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुंबईत होणाऱ्या मोर्चासंदर्भात शेट्टी यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी पवार यांनी आंबा, काजू व नारळ उत्पादनाबाबत सविस्तर माहिती घेऊन चर्चा केली. तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात मोर्चा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय दिला. फळबाग लागवड योजनेकडे आणि निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत राज्य सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. या वेळी आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादकता, नैसर्गिक आपत्ती, आंबा व काजू संशोधन केंद्राचे काम तसेच आयात-निर्यात धोरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या मोर्चामध्ये काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, धर्मराज्य पक्ष, कुणबी सेना आदी प्रमुख पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. दुपारी ३ वाजता गिरगाव चौपाटी येथील टिळक उद्यानात सर्व आंबा बागायतदार शेतकरी एकत्र येऊन ‘वर्षा’ निवासस्थानावर धडक देणार आहेत. या वेळी मराठी भाषा केंद्राचे प्रमुख दीपक पवार, गणेश गावकर यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.