कोनड खुर्दच्या आंब्याचा थेट सौदीत सुगंध; फ्रोझन मँगो पल्पची निर्यात

कोनड खुर्दच्या आंब्याचा थेट सौदीत सुगंध;  फ्रोझन मँगो पल्पची निर्यात
Published on

पान ५
------
आंब्याचा पल्प
निघाला थेट सौदीकडे

कोनड खुर्दच्या फ्रोझन मँगो पल्पची निर्यात; निर्यातीसाठी कंपनीसोबत करार

ॲग्रोवन वृत्तसेवा
बुलडाणा : चिखली तालुक्यातील कोनड खुर्द या छोट्याशा गावातील आभाळमाया ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीने फळप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाऊल ठेवले आहे. येथील कंपनीच्या फळप्रक्रिया केंद्रात तयार करण्यात आलेला उच्च दर्जाचा फ्रोझन मँगो पल्प सौदी अरेबियातील जेद्दा येथे निर्यात करण्यात आला.
या निर्यातीसाठी कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. सौदी अरेबिया, दुबई, रशिया, युरोप आणि भारतातील बाजारपेठांमध्ये कार्यरत असलेल्या या कंपनीच्या ब्रँडअंतर्गत कोनड खुर्द येथील प्रक्रिया केंद्रात हा मँगो पल्प तयार करण्यात आला आहे.
या प्रकल्पातून तयार झालेला तब्बल २७ हजार ३६० किलो फ्रोझन मँगो पल्पचा कंटेनर सौदी अरेबियाकडे रवाना करण्यात आला. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे आणि जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक सागर लांडे यांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखविण्यात आली.
आभाळमाया ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव जावळे पाटील यांनी सांगितले, की पहिल्या निर्यातीपाठोपाठ आणखी दोन कंटेनर मँगो पल्प सौदी अरेबियाला पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर फ्रोझन पेरू पल्पाच्या निर्यातीचेही नियोजन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला स्थानिक बाजारपेठेपुरते मर्यादित न ठेवता त्यावर प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि आधुनिक पॅकेजिंग करून जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ग्रामीण भागातील फळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.
या वेळी तालुका कृषी अधिकारी अशोक सुरडकर, आत्मा प्रकल्प उपसंचालक दीपक बुटे, झेन ॲग्रोचे निर्यात व्यवस्थापक बिलाल काझी, गुणवत्ता व्यवस्थापक माजिद खान, आभाळमाया ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीचे संचालक रंगनाथ पाटील जावळे, गणेश जावळे, गजानन जावळे यांच्यासह कंपनीचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.


फोटो ओळी :
बुलडाणा ः आभाळमाया ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीत तयार झालेला मँगो पल्प घेऊन निघालेल्या कंटेनरला हिरवी झेंडी दाखवताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव जावळे व इतर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com