मॅंगोमेनिया रेसिपी शो आणि पाककृती स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

आंब्याच्या नवनवीन पाककृती शिका, स्पर्धेतून हेलिकॉफ्टर राइडची बक्षिसे जिंका

आंब्याच्या नवनवीन पाककृती शिका, स्पर्धेतून हेलिकॉफ्टर राइडची बक्षिसे जिंका

पुणे - आंबाप्रेमी पुणेकरांसाठी ‘सकाळ मधुरांगण’ने प्रसिद्ध शेफ प्रसाद कुलकर्णी यांच्या ‘मॅंगोमेनिया रेसिपी शो’ व आंब्याच्या पाककृतींच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. येत्या शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी ७ वाजता राजाराम पूल परिसरातील मॅजेंटा लॉन्स येथे होणाऱ्या या शोमध्ये शेफ प्रसाद ‘मधुरांगण’ सभासद व ‘सकाळ’च्या वाचकांना मॅंगो फज, मॅंगो स्मुदी, मॅंगो सालसा, थाई मॅंगो सलाड, कैरस/सासम, असे वैविध्यपूर्ण पदार्थ तयार करायला शिकविणार आहेत. पुणेकरांसाठी खाद्यपदार्थ, ब्रॅंडेड उत्पादने, भातुकलीचे प्रदर्शन, रोबोटिक्‍सची कार्यशाळा, मराठमोळा रॉक बॅंड, आयपीएल स्क्रीनिंग, मुलांसाठी किडस झोन, व्हर्च्युअल गेमिंग, मराठमोळा सेल्फी पॉइंट अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रकारांचा अंतर्भाव फेस्टिव्हलमध्ये करणारे कर्माज पुणेरी फेस्टिव्हल हे या स्पर्धेचे बक्षीस प्रायोजक आहेत. रेसिपी शो विनामूल्य असून, प्रदर्शनाला प्रवेश फी भरावी लागेल. प्रदर्शनाच्या वेळेत ‘मधुरांगण’ची सभासद नोंदणी ‘सकाळ-मधुरांगण’च्या स्टॉलवर शुक्रवारी दुपारी ४ ते रात्री १० व शनिवारी आणि रविवारी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत करता येईल.

आंब्यापासून बनविलेल्या पाककृती स्पर्धेच्या विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके
प्रथम क्रमांक - रु. ४५००० मूल्य असलेली हेलिकॉप्टर राइड- चार व्यक्तींसाठी
द्वितीय क्रमांक - रु. २२५०० मूल्य असलेली हेलिकॉप्टर राइड- दोन व्यक्तींसाठी
तृतीय क्रमांक - रु. ११००० मूल्य असलेली हेलिकॉप्टर राइड एका व्यक्तीसाठी
उत्तेजनार्थ - पारितोषिक विजेत्यांना आकर्षक वॉल क्‍लॉक
स्पर्धेचे नियम व अटी
स्पर्धा विनामूल्य आहे. आंब्यापासून बनवलेला तिखट किंवा गोड पदार्थ सादर करायचा आहे.   स्पर्धेच्या ठिकाणी येताना पदार्थासाठी लागणारा वेळ, साहित्य, खर्च लिहून आणावे. रेसिपी कागदावर आपले नाव न लिहिता आपल्याला दिलेला नोंदणी क्रमांक मोठ्या अक्षरांत लिहावा.  पदार्थ फक्‍त २ व्यक्तींना पुरेल इतकाच असावा.  स्पर्धकांनी सायंकाळी ६.३० ते ७ या वेळेमध्ये आपल्या रेसिपी मांडाव्यात. सायंकाळी ७ नंतर आलेल्या स्पर्धकांचा विचार केला जाणार नाही.  परीक्षणाच्यावेळी सजावटीपेक्षा पदार्थाची चव, घटक पदार्थ, कृती व नावीन्यतेला महत्त्व दिले जाईल.  परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mangomenia recipe show