

इंफाळ, ता. २३ (पीटीआय) : मणिपूरमध्ये वांशिक संघर्षांमध्ये होणारे हत्याकांड रोखण्यात आणि राज्यात शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करत हजारो नागरिकांनी आज विविध जिल्ह्यांमध्ये ‘गोंगाट आंदोलन’ केले. या आंदोलनाअंतर्गत नागरिकांनी रात्री ७.३० ते आठ या अर्ध्या तासात रस्त्यांवर उतरत थाळ्या वाजवल्या, विजेच्या खांबांवर हातोड्याने प्रहार केले, तर अनेकांनी वाहनांचे हॉर्न जोरजोरात वाजवत सरकारवरील आपला राग व्यक्त केला.
आमच्या वेदना राजकीय नेत्यांनी ऐकाव्यात, यासाठी आम्ही इतका आवाज केल्याचे आंदोलकांनी सांगितले. राज्यातील वांशिक हिंसाचार रोखून शांतता निर्माण करण्यासाठी आतापर्यंत आम्ही त्यांच्याकडे विनंती करत होतो, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच असे आंदोलन करावे लागले, असेही त्यांनी सांगितले. काही जणांनी जोरजोरात ड्रमवादनही केले. विविध ठिकाणच्या आंदोलकांनी आवाज करत पूर्वीच्या मणिपूर साम्राज्याचे राजकीय व सांस्कृतिक केंद्र असलेल्या कांगला या ठिकाणाच्या दिशेने मोर्चा काढला. हे ठिकाण लोकभवनापासून काही मीटर अंतरावरच आहे. काही ठिकाणी सुरक्षा दलांनी आंदोलकांना अडविले. मात्र, आंदोलकांची संख्या मोठी असल्याने सर्वांनाच अडविणे पोलिसांना शक्य झाले नाही. आंदोलन सुरू असताना रात्री ७.५० ते आठ या दहा मिनिटांच्या काळात नागरिकांनी आपल्या घरांमधील दिवेही बंद ठेवत अंधार केला होता. लोकभवन परिसरात आलेल्या आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.