मणिपूरमध्ये सहा

मणिपूरमध्ये सहा
Published on

मणिपूरमध्ये ओलिसांच्या
सुटकेसाठी महिलांचे आंदोलन
इंफाळ, ता. २० (पीटीआय) : मणिपूरमधील नागाबहुल भागांमध्ये संशयित कुकी दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या सहा नागा पुरुषांची तातडीने सुटका करण्याच्या मागणीसाठी हजारो महिलांनी बुधवारी विविध ठिकाणी ठिय्या आंदोलन केले.
सेनापती जिल्हा मुख्यालय परिसरातील आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले. बाजारपेठा बंद राहिल्या, तर व्यावसायिक वाहतुकीवरही परिणाम झाला. आंदोलकांनी ओलिसांची तातडीने सुटका करा आणि अपहरण थांबवा अशा घोषणाही दिल्या. नागा वुमन्स युनियनच्या अध्यक्षा प्रिसिलिया थिअुमाई यांनी केंद्र सरकारकडे ओलिसांची सुरक्षित सुटका करण्याची मागणी केली. तसेच दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. १३ मे रोजी कांगपोकपी आणि सेनापती जिल्ह्यांत सशस्त्र गटांनी ३८ हून अधिक लोकांना ओलीस ठेवले होते. त्यापैकी ३१ जणांची सुटका झाली असून सहा नागा पुरुष अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे कुकी आयएनपीआय मणिपूर संघटनेनेही त्यांच्या समाजातील १४ जण नागा गटांकडे ओलीस असल्याचा दावा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com