naval kishor ram.jpg
naval kishor ram.jpg

जिल्हाधिकारी म्हणताहेत, मांजरी बुद्रुक गाव शंभर टक्के कोरोनामुक्त करण्यासाठी...

मांजरी (पुणे) : शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. तो रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने शासनाने घालून दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करावी. यातून मांजरी बुद्रुक गाव शंभर टक्के कोरोनामुक्त करण्यासाठी भर द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यंत्रणेला दिली. हवेली तालुक्यातील मांजरी बुद्रुक येथील कृष्णाजी खंडूजी घुले विद्यालयात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी आमदार चेतन तुपे, उप विभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, हडपसर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रमेश साठे, सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील, सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा देशपांडे, सरपंच शिवराज घुले, जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले, उपसरपंच सुवर्णा कामठे, ग्रामसेवक मधुकर दाते, समन्वयक ए. बी. मोरे, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी यावेळी उपस्थित होते.
 

जिल्हाधिकारी राम म्हणाले, "पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणात वाढत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन उपाययोजना करत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मांजरी बुद्रुकच्या गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणेने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने घालून दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. गावात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यास त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा ताबडतोब शोध घेऊन त्यांची यादी तयार करुन त्यांना नमुना तपासणीसाठी लॅबला पाठविण्यात यावे. नमुना तपासणी अहवाल आल्यानंतर निगेटिव्ह अहवाल असणाऱ्यांना होम क्वॉरन्टाईनचा शिक्का मारुन घरी पाठविण्यात यावे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


कोरोना बाधित गंभीर रुग्णांसाठी लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात जास्तीत जास्त व्हेंटीलेटर बेड व आयसीयू बेडच्या व्यवस्थेबाबतचे लवकरात लवकर नियोजन करावे. यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ती मदत करेल. कोरोना बाधित रुग्णामुळे इतरांना प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी. क्वॉरन्टाईन असणाऱ्यांची रोजच्या रोज ऑक्सीमीटरव्दारे तपासणी करावी. परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. गावात जर कोणी  नियम पाळत नसेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणांनी गावातील कोरोना विषयक आकडेवारी रोजच्या रोज अद्ययावत करुन ठेवली पाहिजे. तसेच या गावच्या प्रतिबंधित क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावे. कोरोना प्रतिबंधासाठी मांजरी गावासाठी मास्क, सॅनिटायझर इत्यादी साहित्याची आवश्यकता असल्यास ताबडतोब जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करावा. गावपातळीवर कोरोना विषयक जनजागृती करण्यावर भर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमदार चेतन तुपे म्हणाले, शेतकऱ्यांना व्यवसायासाठी मार्केट कमिटीमध्ये जागा दिली तर चांगले होईल. कोरोना बाधितांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेण्यावर भर दिला पाहिजे, यामुळे मांजरी गाव निश्चित शून्यावर येईल. सरपंच शिवराज घुले म्हणाले, "गावाची लोकसंख्या एक लाखाच्या जवळपास आहे. शहरात जाणारा कामगार वर्ग मोठा आहे. त्यामुळे गावात संसर्ग वाढण्याचा धोका मोठा आहे. येत्या काळात होणाऱ्या लाॅकडाऊनसाठी गावातील पोलिस प्रशासनाची मदत आवश्यक आहे. त्यांनी ही मदत पुरविल्यास संसर्ग रोखण्यास मोठी मदत होईल."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com