

Grand Wrestling Arena at Manjari Budruk Festival
Sakal
मांजरी : शड्डूंचा कडकडीत आवाज, बजरंग बलीसह ग्रामदेवता मांजराई देवीचा जयजयकार आणि टाळ्या आरोळ्यांनी भारावलेल्या वातावरणात तसेच, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मैदाने गाजवलेल्या एकाचढ एक मल्लांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीने मांजरी बुद्रुकच्या उरसात वीस लाख रुपयांच्या बक्षिसांचा आखाडा रंगला. क्षणाक्षणाला बदलणारे जय पराजयाचे चित्र, आणि एखाद्या क्षणी श्वास रोखून धरायला लावणाऱ्या कुस्तीच्या डावाने कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.