
Manjri Protest
Sakal
मांजरी : गाव महापालिकेत समाविष्ट होऊन, तीन वर्षे उलटून गेली आहेत. मात्र, मागणी करूनही येथील वसाहतींना गलिच्छ वस्ती निर्मूलन अंतर्गतसह इतरही सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे येथील रहिवास्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या बाबींकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील महिलांनी दररोज दुपारी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.