Tribal Students Protest: थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईपर्यंत आंदोलन तीव्रच; आदिवासी विद्यार्थ्यांचा अन्यायाविरोधात निर्धार

आदिवासी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण, दोन जणांची प्रकृती बिघडली; सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार
Tribal Students Protest

Tribal students continue their protest outside the government hostel for the 13th consecutive day, demanding action on their various demands and insisting on direct talks with the Chief Minister.

sakal

Updated on

पुणे/मांजरी : शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशातील वयाची अट शिथिल करावी, शासन निर्णय घेताना विद्यार्थ्यांच्या सूचनांचा विचार करावा, शासकीय वसतिगृहे शहराच्या मध्यवर्ती आणि सोयीच्या ठिकाणी असावीत, आदिवासींच्या आरक्षित पदांचे संरक्षण आणि रिक्त पदांच्या भरती तातडीने पूर्ण करा, अशा विविध मागण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान दोन विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल केले. ‘‘आमच्या मागण्यांबाबत आम्ही आता थेट मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करू, राज्य सरकारमार्फत सर्व मागण्या मान्य होत नाहीत आणि त्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवू’ असा पवित्रा घेत विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com