
मांजरी : मांजरी बुद्रुकमधील अनेक भागात रस्त्यांसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र, रस्त्यांवरून वाहतूक सुरळीत होण्याऐवजी रस्त्याच्या कडेलाच दुचाकी, चारचाकी गाड्या पार्किंग केल्या जात असून प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊन रस्ते ठप्प होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, पादचारी नागरिक, महिला, विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे बेशिस्त पार्किंगचे प्रस्थ वाढत आहेच. पदपथांवर लाखो रुपचे खर्च करून ते नागरिकांना चालण्यासाठी नव्हे तर व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी केले जात आहेत, असाही सवाल येथील नागरिक करित आहेत.