
PMC Commissioner's Warning: Resolve Manjari-Shewalewadi Civic Woes or Face Suspension.
Sakal
मांजरी : "चार वर्षे उलटूनही समाविष्ट गावातील प्राथमिक सुविधांबाबतच्या समस्या अद्याप सुटू शकल्या नाहीत. कचरा, ड्रेनेज, वीज, पाणी, रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी आणि दररोजच्या साफसफाईकडेही दुर्लक्ष होत असलेले दिसत आहे. सामान्य माणसाला किती त्रास सहन करावा लागत असेल, मग येथील अधिकारी आणि कर्मचारी करतात तरी काय ? असा सवाल करीत महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी संबंधित पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अशा कामचुकार अधिकाऱ्यांची गय न करता घरी बसविणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.