मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघाले आहे. २७ ऑगस्टला ते अंतरवाली सराटीतून निघाले. आज २८ ऑगस्ट रोजी ते शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की मुंबईतील आंदोलनाला एक दिवसाची परवानी देणे म्हणजे गोरगरीब मराठ्यांची चेष्टा करण्यासारखे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी समाजाच्या भावना समजून घ्याव्यात.