Maratha Morch : मराठा वादळ मुंबईच्या दिशेने! 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वरील वाहतुकीत मोठे बदल; 'या' मार्गांचा करा वापर

Manoj Jarange Morcha Route update : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांने पाटील हे मुंबईत आंदोलन करणार आहेत. लाखो मराठी कार्यकर्त्याच्या ताफ्यासह ते गुरुवारी (ता. २५) खालापूर येथून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून जाणार आहेत.
Manoj Jarange Morcha Route mumbai pune expressway traffic update latest Marathi News
Manoj Jarange Morcha Route mumbai pune expressway traffic update latest Marathi News

खालापूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांने पाटील हे मुंबईत आंदोलन करणार आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून लाखो मराठी कार्यकर्त्याच्या ताफ्यासह ते गुरुवारी (ता. २५) खालापूर येथून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून जाणार आहेत. बुधवारी लोणावळा येथील मुक्कामानंतर रिक्षावी मैदान येथून गुरुवारी सकाळी वळवण येथून मार्गस्थ होणार असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यात येणार आहे. (Manoj Jarange Morcha Route)

खालापूर हद्दीत पोलिस बंदोबस्त

मराठा आंदोलकांचा मोर्चा खालापूर हद्दीत प्रवेश केल्यापासून अमृतांजन पुलापासून टप्पाटप्प्यावर पोलिस तैनात असणार आहेत. चार उपविभागीय पोलिस अधिकारी, १० पोलिस निरीक्षक, ४० पोलिस उपनिरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आणि ६५० पोलिस कर्मचारी तैनात असणार आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाचे तीन पथक तैनात असणार आहेत.

Manoj Jarange Morcha Route mumbai pune expressway traffic update latest Marathi News
Gold Mine Collapse : सोन्याची खाण ठरली जीवघेणी! मालीत भीषण अपघातात 70हून अधिक लोकांचा मृत्यू

असा असेल बदल

गुरुवारी सकाळी ६ ते शुक्रवारी दुपारी १२ वाजता या कालावधीत पुणेकडून येणारी हलकी वाहने द्रुतगती मार्गावरून वळवून जुना मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग क. ४८ वरून मार्गस्थ करण्यात येतील.

मोर्चा खोपोली बाह्यमार्गाच्या पुढे गेल्यानंतर पुण्याकडून येणारी हलकी 3 वाहने व य बस बाह्यमार्गावरून वळवून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडंग टोलनाकामार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ होतील.

गुरुवारी सकाळी ६ ते मराठा आंदोलकांचा मोर्चा कळंबोली * बाह्ममार्गाच्या पुढे जाईपर्यंत वाकण, पाली, खोपोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ (अ) तसेच पेण-खोपोली राष्ट्रीय महामार्ग कमांक १६६ (ड) मार्गे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई दिशेकडील येणार्या वाहनांना (मराठा आंदोलकांची वाहने वगळून) बंदी असेल.

गुरुवारी सकाळी ६ ते शुक्रवारी दुपारी १२ वाजता या कालावधीत गोवा • मुंबई राष्ट्रीय महामार्ग कमांक 66 मार्गे नवी मुंबई, मुंबई बाजुकडे येणाऱ्या जड-अवजड वाहनांना बंदी असेल.

Manoj Jarange Morcha Route mumbai pune expressway traffic update latest Marathi News
Weather App News: पुण्यातील १३ वर्षीय विद्यार्थ्याने तयार केले हवामान ॲप; देशातील प्रत्येक गाव, अन् शहराचे तपासता येणार हवामान

मैदाने, सभागृहांचे पर्याय

मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलनकर्त्यांची राहण्याची, जेवणाची, शौचालयांची सोय करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई महापालिका, तसेच सिडको व पोलिस प्रशासनाकडे यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. एपीएमसी बाजार समितीची जागा कमी पडल्यास महापालिकेची मैदाने, सभागृह असे पर्याय उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी विनंती मराठा कांती मोर्चातर्फे नवी मुंबई महापालिकेला केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com