Weather App News: पुण्यातील १३ वर्षीय विद्यार्थ्याने तयार केले हवामान ॲप; देशातील प्रत्येक गाव, अन् शहराचे तपासता येणार हवामान

राज्यात सतत बदलत असलेल्या हवामानामुळे तसेच, वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, सरकारकडून यावर अनेक उपाययोजना केल्या जातात मात्र परिस्थिती बदलत नाही.
Weather App News
Weather App News
Updated on: 

Weather App News: पुण्यातील एका १३ वर्षीय विद्यार्थ्याने हवामान ॲप तयार केले आहे. देशातील कोणत्याही गाव आणि शहराचे हवामान या ॲपमध्ये तपासता येणार आहे. राज्यात सतत बदलत असलेल्या हवामानामुळे तसेच, वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, सरकारकडून यावर अनेक उपाययोजना केल्या जातात मात्र परिस्थिती बदलत नाही. सुप्रीम कोर्टाने देखील वाढत्या प्रदुषणावर चिता व्यक्त केली आहे.

दरम्यान पुणे येथील द अकॅडमी स्कूल (TAS) चा १३ वर्षीय विद्यार्थी पलाश वाघ याने हवामान ॲप तयार केले आहे. हा विद्यार्थी इयत्ता आठवी मध्ये शिकत आहे. पलाश याने हवामानाचा अंदाज घेणारा ॲप तयार केला आहे. यामुळे पलाशचे कौतुक होत आहे. (Pune News)

विद्यार्थी पलाश वाघ म्हणाला,  “इतरांपेक्षा मला काहीतरी वेगळं करायचं आहे. माझे आवडते विषय भूगोल आणि संगणक आहे. या दोन विषयांचा आधार घेऊन मी कोडिंग करण्याचा प्रयत्न केला. हे ॲप जावा स्क्रिप्ट आणि एचटीएमएल वापरून तयार केले आहे. वापरकर्ता इंटरफेस सीएसएसने केला आहे. हे ॲप  ॲपप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) नावाच्या सॉफ्टवेअरशी जोडले गेले आहे. जे उपकरणाच्या स्थानानुसार रिअल-टाइम हवामान दर्शवण्यास मदत करते. हे ॲप परिसरातील वाऱ्याचा वेग आणि आर्द्रता देखील दर्शवते."

Weather App News
IND vs ENG 1st Test : ब्रिटीश नागरिकांना... शोएब बशिरसाठी पंतप्रधान ऋषी सुनक मैदानात

टीएएसच्या सीईओ डॉ. मैथिली तांबे  म्हणाल्या, “विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना प्रगल्भ करण्याचा आमचा प्रयत्न असतो. प्रात्यक्षिकरित्या विद्यार्थी शिकताना त्यांच्यातील सर्वोत्कृष्ट गोष्टी समोर येतात. शिवाय त्यांना शिकत असताना त्यांना प्रोत्साहन देणे,  त्यांच्या कलागुणांना वाव देणे महत्वाचे आहे. जेणेकरून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो," असे  म्हणाल्या. (Latest Marathi News)

Weather App News
Maratha Reservation : ''जरांगेंना कोर्टात हजर राहावं लागणार, परवानगी नसलेला मोर्चा थांबवावा लागेल'' सुनावणीनंतर सदावर्ते म्हणाले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

India weather forecast October 10
IMD weather forecast October 8 heavy rain alert
IMD weather forecast 29 September 2026 rain alert
Maharashtra Weather
Marathi News Esakal
www.esakal.com