पुणे - मनोज जरांगे पाटील यांचे हे आंदोलन मराठा आरक्षणासाठी नाही तर राज्यातील सरकार उलथून टाकण्यासाठीचा एक अजेंडा आहे. या कटात विरोधी पक्षासह सत्ताधारी अजित पवार गटाचे आमदार, खासदारदेखील सहभागी आहेत, असा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.