

Alephata Rasta Roko Junnar Maratha Community Supports Manoj Jarange Patil Hunger Strike and Warns Government of Mumbai March
esakal
राजेश कणसे
आळेफाटा : अंतरवाली सराटी येथे संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्या सरकारने तातडीने पूर्ण कराव्यात, या मागणीसाठी सकल मराठा समाज, जुन्नर यांच्या वतीने गुरुवारी (दि. ११) आळेफाटा (ता.जुन्नर) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.