मराठा तरूण तरुणींच्या लग्नपत्रिकेवर शुभाशीर्वाद म्हणुन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे नाव

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आणि बघता बघता राज्यातील मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्याशी पाठीशी उभा राहिला आणि क्रांती घडली मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे दैवत बनले आहे.
manoj jarange patil name flash on marriage invitation card as maratha warrior
manoj jarange patil name flash on marriage invitation card as maratha warriorSakal

पारगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आणि बघता बघता राज्यातील मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्याशी पाठीशी उभा राहिला आणि क्रांती घडली मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे दैवत बनले आहे.

विवाह सोहळ्याच्या लग्नपत्रिकेत वधू वरास शुभाशीर्वाद म्हणून मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे नाव मराठा समाजातील तरूण तरुणींच्या लग्नपत्रिकेच्या दर्शनी भागावर झळकू लागले आहे.

आंतरवली सराटी मधून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषण केले आणि बघता बघता मनोज जरांगे पाटील हे राज्यात नव्हे तर देशात मराठा समाजाचे नेते म्हणुन ओळखू लागले त्यांच्या सभांना राज्यात लाखोंची गर्दी होऊ लागली त्यांच्या आंदोलनाने मराठा आरक्षणाबाबत सरकारला महत्वपूर्ण निर्णय घेण्यास भाग पडले आहे.

मनोज जरांगे पाटील मराठा समाजातील तरूण तरुणीच्या गळ्यातील ताईत बनले आहे त्यांना राज्यभरातून व्यापक पाठिंबा मिळत आहे. त्यांनी पुन्हा आरक्षणाच्या पाठ्पुराव्यासाठी उपोषण सुरु केले आहे.

तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराईला सुरुवात होते विवाह सोहळ्यात नातेवाईक, मित्र मंडळी यांना निमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिका झापल्या जातात लग्नपत्रिकेवर भाऊबंध , मामा- मामी, काका- मावशी, मित्र,

आजी-आजोबा,आत्या –मामा , जावई परिवार , व्यवस्थापक, स्वागतोत्सुक, संयोजक, किलबल परिवार, प्रमुख उपस्थिती, प्रेक्षक, कार्यवाहक, शुभाशीर्वाद अशा पध्दतीने विविध प्रकारातून अनेकांची नावे लग्नपत्रिकेत टाकली जातात. काही कार्यमालक शुभाशीर्वाद मध्ये गुरु महाराज, मंत्री, खासदार व आमदार यांची नावे लग्नपत्रिकेत टाकतात.

आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील परंतु सध्या पाबळ येथे वास्तव्यास असलेल्या टेमकर परिवारातील चि. सौ. कां. साक्षी व शिरूर तालुक्यातील पाबळ येथील नऱ्हे परिवारातील चि.आदित्य यांच्या विवाह सोहळ्याच्या पत्रिकेवर टेमकर परिवाराने शुभाशीर्वाद मध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बरोबरीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे नाव टाकुन मनोज जरांगे पाटील यांच्या प्रती श्रध्दा व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com