Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आपली एकजूट अशीच कायम ठेवा मनोज जरांगे पाटील |manoj jarange patil says keep your unity for Maratha reservation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

manoj jarange patil says keep your unity for Maratha reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आपली एकजूट अशीच कायम ठेवा मनोज जरांगे पाटील

लोणावळा : मराठा आरक्षण आपल्या हक्काचे आहे, आपल्याला कोणाचे घ्यायचे नाही. आरक्षणाचा हा लढा आपण अर्धा जिंकलेला आहे, अर्धा जिंकायचा आहे. काळ कसोटीचा आहे, यासाठी मराठा बांधवांनो आपली एकजूट अशीच कायम ठेवा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील राज्याच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यातील सभा उरकत खोपोली येथील सभेसाठी जात असताना लोणावळ्यात जरांगे पाटील यांचे लोणावळेकरांच्या वतीने जंगी स्वागत झाले. यावेळी ते बोलत होते.

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, आमच्या लेकरांच्या वाटोळे झाले. ७० वर्ष आमचे खाल्ले. आमच्याकडे एकही प्रमाणपत्र नव्हते. लवकरच सत्तर टक्के लोकांना आता प्रमाणपत्रांचे वाटप होईल.मराठा आरक्षण मिळवण्यासाठी राज्यातला मराठा एक झाला आहे.

ही एकजूट अशीच कायम ठेवा असे जरांगे म्हणाले. छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. म्हातारा व्यक्ती आहे म्हणून काही बोलत नाही. आमचे सत्तर वर्षे खाल्ले, ते पचणार नाही असे म्हणत सडकून टीका केली. जरांगे पाटील लोणावळ्यात दाखल होताच डीजे तालावर चार जेसीबींच्या माध्यमातून त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. यावेळी सकल मराठा समाजासह लोणावळेकर मोठ्या संखेने उपस्थित होते.

मराठा, धनगर, मुस्लिम, बंजारा एकत्र आल्यास 'कार्यक्रमच'..

मुस्लिम समाजानेही उपस्थिती लावत जरांगे पाटील यांचे स्वागत केले. मुस्लिमांनीही राज्यात मराठा आरक्षणास पाठिंबा दिला आहे. बंजाराही आले आहेत. धनगरांच्या आरक्षणाचाही प्रश्न आहे. आपणही त्या सर्वांना पाठिंबा देऊ. आरक्षण सर्वांनाच मिळू देत. मराठा, धनगर, मुस्लिम, बंजारा हे चार जण एकत्र आल्यास 'कार्यक्रमच' होईल असे जरांगे पाटील म्हणाले.