

sakal
भिगवण : ‘‘मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या कोणत्याही आरक्षणास धक्का लागणार नाही. १८८१ पासूनच्या कुणबी नोंदी असूनही केवळ शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे,’’ अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मांडली.