
पुणे: वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा दिलीप खेडकर (वय ४८, रा. नॅशनल सोसायटी, बाणेर-पाषाण रस्ता) यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चतु:शृंगी पोलिसांनी सोमवारी (ता. १५) खेडकर यांच्या बंगल्याची झडती घेतली. मात्र, परंतु तिथे काही आढळून आले नाही.