अनेक अखिलेश इथे आहेत म्हणत बापटांनी थोपटली सोमय्यांची पाठ

सोमय्यांच्या सत्कारांनतर काँग्रेसकडून गोमूत्र टाकून शुद्धीकरण
Girish Bapat
Girish Bapat Sakal

पुणे : पुणे महापालिकेच्या आवारात सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर आज भाजपकार्येकर्त्यांकडून सोमय्यांचा त्याच पायरीवर सत्कार करण्यात आला. मात्र, या सत्कारांनतर काँग्रेसकडून पायऱ्यांवर गोमूत्र टाकून त्या शुद्ध करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, संजय राऊतांपासून सगळे विचार करत असतील की, सोमय्यांना उत्तर प्रदेशात का पाठवलं नसेल, पण अनेक अखिलेश इथे देखील आहेत असे म्हणत, त्यांची प्रकरणे बाहेर करण्याचे काम सोमय्या करत आहेत, असे विधान खासदार गिरीष बापट यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Girish Bapat Support On Kirit Somaiya )

Girish Bapat
Video: जिथे पडले होते तिथेच सोमय्यांचा सत्कार

कोविड कंपनी बोगस होती

पुण्यात जंम्बो रूग्णालयासाठी कंत्राट देण्यात आलेली कंपनी बोगस असल्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. आयुक्तांच्या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील दावा केला आहे. गेल्या शनिवारी सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेच्या आवारात हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आज सोमय्या पुन्हा आयुक्तांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी ज्या पायरीवर हल्ला करण्यात आला होता, त्याच पायरीवर किरीट सोमय्यांचा शाल, श्रीफळ आणि चाबूक देऊन सत्कार करण्यात आला आहे. दरम्यान, अशा प्रकारे सत्कार करण्यास पोलिसांकडून परवानगी नव्हती, मात्र तरीही हा सत्कार करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com