esakal | तब्बल सहा लाख विद्यार्थी देणार दुसरी सत्रातील परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Online Exam

तब्बल सहा लाख विद्यार्थी देणार दुसरी सत्रातील परीक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या दुसऱ्या सत्र परीक्षेसाठी जवळपास सहा लाख विद्यार्थ्यांनी (Student) अर्ज (Form) केले आहेत. या परीक्षांना १२ जुलैपासून सुरू सविस्तर वेळापत्र विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र अशा एकूण २८४ अभ्यासक्रमांसाठी चार हजार १९५ विषयांसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. (Many as Six Lakh Students will Appear for the Second Semester Exams)

मुख्य परिक्षेपूवी ८ ते १० जुलै दरम्यान विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा (मॉक टेस्ट) घेण्यात येणार आहे. विद्यापीठाची दुसऱ्या सत्रातील मुख्य परीक्षा १२ जुलैपासून सुरू होणार असून परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. या परीक्षा प्रॉक्टर्ड पद्धतीने घेण्यात येणार असून ६० प्रश्नांची ऑनलाइन परीक्षा असणार आहे. यातील ५० प्रश्नांची उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. विज्ञान व अभियांत्रिकी विद्याशाखेतील गणित व संख्याशास्त्र या विषयांसाठी एकूण ३० प्रश्न विचारले जाणार असून त्यातील २५ प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरण्यात येतील. या सर्व परीक्षेत विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही अर्ज भरता न आलेल्या विद्यार्थ्यांना १२ ते १४ जुलै दरम्यान परीक्षा अर्ज भरता येणार आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा स्वतंत्ररीत्या घेण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली.

हेही वाचा: लॉकडॉऊनमुळे होम अ‍ॅप्लायन्सेसची मागणी वाढली

ऑनलाइन परीक्षेदरम्यान लॉग इन न होणे, लॉग आउट होणे, इंग्रजी/ मराठी माध्यम प्रश्नपत्रिका उपलब्ध न होणे, आकृत्या न दिसणे, पेपर सबमिट न होणे, विद्यार्थ्यास परीक्षेच्या वेळी कोरोनाची बाधा होणे, विद्यापीठ आयोजित परीक्षा किंवा अन्य सीए, सीईटी तत्सम परीक्षा एकाच दिवशी येणे अशी कारणे असणाऱ्या विद्यार्थ्यांना तक्रार करता येईल, मात्र प्रत्येक तक्रारीची छाननी होईल. तसेच अन्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेचे हॉल तिकीट किंवा तत्सम पुरावा देणे गरजेचे असेल, असे काकडे यांनी स्पष्ट केले आहे.

‘ऑनलाइन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी गैरवर्तन करू नये. यासाठी या सत्र परीक्षेत प्रायोगिक तत्त्वावर नमुना दाखल काही विद्यार्थ्यांचा आवाज रेकॉर्ड करण्यात येईल. यामुळे परीक्षा अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल.’

- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

loading image