शहर कोरोनामुक्त झाल्याने इथं व्यवहार होताहेत सुरळीत...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

- काही दुकानांना दोनऐवजी तीन दिवस सुरु ठेवण्याची परवानगी

बारामती : शहर कोरोनामुक्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून काही दुकानांना दोनऐवजी तीन दिवस सुरु ठेवण्याची परवानगी दिली गेली. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील सर्व स्वीट होम्सना आता गुरुवार, शुक्रवार व शनिवार तर लॉन्ड्री, इस्त्रीची दुकाने व स्टोव्ह गॅस दुरुस्तीच्या दुकानांना सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुसरीकडे कापड व्यावसायिकांच्या दुकाने सुरु ठेवण्याच्या वारांमध्ये बदल करण्यात आला असून आता बुधवार व शनिवारी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. इतर दुकानांचे वार व वेळा पूर्वीप्रमाणेच आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामती शहरात गेल्या सोमवारपासून काही अटी व शर्तींवर दुकाने ठराविक वेळांसाठी उघडण्याची परवानगी देण्यात आली होती. 14 एप्रिलनंतर शहरात एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नसल्याने व्यापारपेठ सुरु करण्यस परवानगी दिली गेली आहे. 
बारामतीची परिस्थिती झपाट्याने सुधारली असल्याने आता सर्वच दुकानांना दररोज सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात यावी जेणेकरुन गर्दीची तीव्रता कमी होईल, अशी व्यापा-यांची मागणी आहे. मात्र बाहेरगावाहून बारामतीत वास्तव्यास येणा-यांमुळे कोरोनाच्या संक्रमणाची भीती प्रशासनास सतावत असून आता बाहेरगावाहून येणा-यांच्या तपासणीसाठी सातत्याने लक्ष ठेवण्याची पाळी आरोग्य विभागावर आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, मंगळवारपासून (ता. 19) रुई येथील कोविड केअर सेंटर सुरु होणार आहे. या ठिकाणी 20 रुग्णांची व्यवस्था होणार असून 8 अतिदक्षता विभागातील खाटा असतील. त्या मुळे तपासणी व कोरोनाची मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना रुई येथे ठेवले जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many shops remain open in Baramati after Lock Down