अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी तब्बल एवढ्या विद्यार्थ्यांनी केले अर्ज

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी दुस-या फेरीतून प्रवेश मिळण्यासाठी ७५ हजारपेक्षा विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज केले आहेत. १० सप्टेंबर रोजी या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर होणार प्रसिद्ध आहे.

पुणे - इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी दुस-या फेरीतून प्रवेश मिळण्यासाठी ७५ हजारपेक्षा विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज केले आहेत. १० सप्टेंबर रोजी या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर होणार प्रसिद्ध आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ३०४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. पहिल्या फेरीनंतर ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीमध्ये दुसऱ्या फेरीसाठी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळपर्यंत ७५ हजार ६३० विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले आहेत.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असाइनमेंट बेस घ्या; मुख्यमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?

दुस-या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दहा ते बारा सप्टेंबर या कालावधीमध्ये मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रथम पसंती क्रमानुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे, असे
अधिका-यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many students applied for the second round of 11th admission